मुख्य बातमी

पाली शासकीय विश्रामगृहाच्या सुरू असलेल्या कामाची आमदार किरण सामंत यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

रत्नागिरी : तालुक्यातील पाली येथील एमआयडीसीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची पाहणी लांजा-राजापूर-साखरपा विधानसभेचे आमदार किरण सामंत यांनी केले. विश्रामगृहाच्या बांधकामाला गती मिळावी आणि दर्जेदार पद्धतीने काम व्हावे, यासाठी आमदार सामंत यांनी पाहणी केली. त्यांनी कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेतली आणि उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

यावेळी आमदार सामंत यांनी सांगितले की, “पालीसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी शासकीय विश्रामगृह उभारल्याने नागरिक, अधिकारी, तसेच विविध कामानिमित्त येणाऱ्या पाहुण्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या इमारतीचे काम दर्जेदार होऊन ते वेळेत उपलब्ध व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!