मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

सेवानिवृत्ती ही आनंदी जीवनाचे महाद्वार बनावे : संजयराव कदम

खेरशेतचे सुपुत्र अनिल काशिराम कदम यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) : या धावपळीच्या जीवनात कुटुंबाकडे दुर्लक्ष झाले, तरी चालेल पण माझ्या समाजाकडे दुर्लक्ष होता कामा नये, इतक्या निस्वार्थीपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचे काम करणारे अनिल काशिराम कदम यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य हे कौटुंबिक अडगळ न बनता वृद्धत्वाची मरगळ झटकून उदबत्तीच्या सुगंधाप्रमाणे सदैव दरवळत राहावे आणि आनंदी जीवनाचे महाद्वार बनावे, अशा शुभेच्छा मुंबई संघटनेचे माजी अध्यक्ष व मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या सेवाभावी संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजयराव शांताराम कदम यांनी केले.

धम्मभूषण विकास संघ, खेरशेत (मुंबई) रजि. या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आयु. अनिल कदम यांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा ओमकार गृहनिर्माण सोसायटी, जुईनगर (नवी मुंबई) येथे संघटनेचे माजी अध्यक्ष आयु. शरद कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ सल्लागार आयु. चंद्रमणी जानू कदम, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती गाव शाखा खेरशेत या ग्रामीण शाखेचे अध्यक्ष सुनिल शंकर कदम, उपाध्यक्ष विजय शांताराम कदम, मुंबई संघटनेचे खजिनदार मिलिंद काशिराम कदम उपस्थित होते.

अनिल कदम हे युटीआय म्युअचल फंड वाशी (नवी मुंबई) युएफसीमधून प्रदीर्घ काळ सेवा बजावून वरिष्ठ शिपाई या पदावरून नुकतेच सेवानिवृत्ती झाल. त्यानिमित्त श्री. कदम व सौ. अनुराधा कदम यांना मान्यवरांच्या हस्ते महावस्त्र, पुष्पकरंडक, सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुंबई संघटनेचे उपाध्यक्ष दयानंद राजाराम कदम यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त केक कापून मान्यवरांच्या हस्ते महावस्त्र, पुष्पकरंडक देऊन मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी शुभेच्छा देताना संजयराव कदम म्हणाले, असेल पेन्शन तर नसेल टेन्शन; परंतु ज्यांना पेन्शनच नसेल त्यांनी मात्र आपल्या सेवा काळात काटकसरीने अर्थव्यवस्थेचे नियोजन करावे. “सब्बे सत्ता सुखी होन्तु ||” या बुद्ध वचनाचा भावार्थ सांगून सत्कारमूर्ती यांना संजयराव कदम यांनी मंगलमय शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जेष्ठ सल्लागार चंद्रमणी कदम, गाव शाखेचे अध्यक्ष सुनील कदम यांनीही शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर मनोगत व्यक्त करताना अनिल कदम यांनी कृतज्ञता व्यक्त करताना माझा जन्म गरिबीत झाला असला तरी गरिबीवर मात करताना मला मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला म्हणूनच आजचा सत्कार स्विकारण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य समजतो, असे सांगितले.

शेवटी शरद शंकर कदम यांच्या अध्यक्षीय भाषणाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई संघटनेचे युवा चिटणीस संज्योत सखाराम कदम यांनी केले. यावेळी मनोज कदम, सुशांत कदम, रूपेश कदम, संदेश कदम, सुमेध कदम, सुकुमार कदम, चिरंजीव कदम, रोहन कदम, सिद्धार्थ कदम, महेंद्र कदम, देवेंद्र कदम, अभिजीत कदम, अविनाश पवार, अजय पवार, महेश जाधव, सौ. अंकिता जाधव, शैलेश जाधव, सौ. निलिमा जाधव, सुभाष सावंत, सौ. सुहासिनी सावंत, सौ. प्रेरणा मोहिते, प्रवीण मोहिते, संजय प्र. कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!