नॅशनल मेडिकल्सची तिसरी शाखा रत्नागिरीकरांच्या सेवेत

रत्नागिरी : दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर नॅशनल मेडिकल्सच्या तिसऱ्या शाखेचे उद्घाटन प्रथितयश डॉ. रमेश चव्हाण व उद्योजक अण्णा सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. मारुती मंदिर येथील गोडबोले स्टॉप येथे सुरू झालेल्या या शाखेमुळे मारुती मंदिरसह उद्यमनगर, कोकण नगर आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत.
ओसवाल कुटुंबियांची तीन पिढ्यांची परंपरा व केअरिंग कल्चर हे ब्रीदवाक्य आजपर्यंत तंतोतंत जोपासत रत्नागिरीकरांची काळजी घेण्याची संस्कृती कायम ठेवली आहे. २६ जानेवारी १९८६ ला नॅशनल मेडिकल्सची पहिली शाखा रत्नागिरीत सुरू झाली. त्यावेळेला रत्नागिरीत सर्वप्रकारची औषधे मिळत नव्हती; मात्र नॅशनल मेडिकल्सने त्यावेळी “वन स्टॉप शॉपिंग” हा नवीन प्रकार सुरू केला. म्हणजेच सर्व प्रकारची औषधे एकाच ठिकाणी मिळण्याची सोय केली. त्यांच्या या उपक्रमाला रत्नागिरीकरांनी भरभरून प्रतिसाद दिला व काही महिन्यांतच हे दुकान लोकांच्या पसंतीस पात्र ठरले.
कालांतराने रत्नागिरीची होणारी वाढ व गिन्हाईकांना होणारी अडचण लक्षात घेता ओसवाल कुटुंबियांनी २०१८ मध्ये मारुती मंदिरच्या आसपास नवीन दुकान सुरू करण्यासाठी चाचपणी केली व लवकरच त्यांची दुसरी शाखाही सुरू केली. या शाखेत मात्र यावेळी काहीतरी आगळं वेगळं करायचे ठरवले व त्यांनी रत्नागिरीकरांना नामांकित कंपन्यांचे कॉस्मेटिक मिळावे म्हणून त्यासाठी वेगळे दालनही सुरू केले. या शाखेत मिळणाऱ्या सेवेमुळे अल्पावधीत ते ही लोकप्रिय झाले.
भरत ओसवाल व दिनेश ओसवाल या बंधूंशी चर्चा करताना त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आपले वडील श्री. चंदनमल ओसवाल यांनी घेतलेल्या कष्टाला दिले. त्यांनी ज्या नितीमत्तेने व्यापार केला व आम्हालाही तेच शिकविले म्हणून आज ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास आम्ही संपादन करु शकलो याची ग्वाही त्यांनी दिली.



