मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
नागालँड, मणिपूरच्या विद्यार्थिनींनी बांधली रत्नागिरी पोलीस दलाच्या पोलिसांना राखी

चिपळूण : चिपळूण पोलीस ठाण्याच्या हद्दीत छात्रावासात नागालँड व मणिपूर येथील विद्यार्थिनी शिक्षणासाठी राहतात. या विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाचे औचित्य साधत९ ऑगस्ट रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने, चिपळूण पोलीस ठाण्याचे निरीक्षक फुलचंद मेंगडे तसेच उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राख्या बांधल्या.

यावेळी मराठीतील “श्री गणेश आगमन गीत” गाऊन दाखविले. या प्रसंगी पोलीस अधीक्षक रत्नागिरी नितीन बगाटे यांनी त्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.




