शिववैभव पतसंस्थेला प्रथम क्रमांकाचा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार
संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा पुरस्कार

संगमेश्वर : शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था कुचांबे या संस्थेला कोकण विभागात महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शिववैभव पतसंस्था कुचांबे या संस्थेने सन २०२४ – २०२५ आर्थिक वर्षात ८५ कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या असून, ६५ कोटींचे वितरीत करण्यात आले आहे, तर ३० कोटींची गुंतवणूक झाली आहे. वसूल भाग भांडवल ४ कोटींचे असून, १ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. एकूण व्यवसाय १५२ कोटी रुपये आहे.
महाराष्ट्र शासन सहकार विभाग यांनी ठरवून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेने सी. डी. रेशो ६९.७४ टक्के संस्थेचा सीआरआर १.५० टक्के तसेच संस्थेचा एसएलआर २८.२४ टक्के आणि संस्थेचा सीआरएआर १३.४४ टक्के आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात संस्थेचे चेअरमन चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश थेराडे, संस्थेचे सेक्रेटरी संतोष थेराडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व संचालक, तसेच कर्मचारी यांनी अतोनात मेहनत संस्थेचा आलेख दररोज कशा पद्धतीने वाढेल याकडे लक्ष देऊन तसेच संस्थेची सुलभ सेवाभावी पद्धतीने काम करून संस्थेला हा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल संस्थेचे तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे संचालक पदाधिकारी यांचे सभासदांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
हा पुरस्कार कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाचे यश आहे. कर्मचारी व संचालक मंडळ मेहनतीमुळे सतत ऑडिट “अ” वर्ग मिळवण्यात यश आले आहे. पुरस्काराचे श्रेय हे सर्व कर्मचारी, ठेवीदार यांना जाते, असे कौतुकास्पद उद्गार संस्थेचे सरचिटणीस संतोष थेराडे यांनी काढले.
हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे व अप्पर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर सहकारी संस्था पुणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार संस्थेचे सेक्रेटरी संतोष थेराडे, संस्थेचे संचालक संजय कानल, जनरल मॅनेजर रवींद्र थेराडे, संकेत थेराडे, कौस्तुभ मयेकर, सिद्धार्थ लाड संस्थेचे सल्लागार बालकृष्ण काष्टे यांनी स्वीकारला.



