मुख्य बातमी
शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांनी घेतली जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांची सदिच्छा भेट

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा माजी माजी आमदार बाळ माने यांनी कोकणातील प्रसिद्ध अध्यात्मपीठाचे अधिष्ठाता जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त मठात भेट घेऊन महाराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी नाणीज येथील श्रीक्षेत्राचे भावी पीठाधीश कानिफनाथ महाराज उपस्थित होते. यावेळी महाराजांनी श्री. माने यांचे आपुलकीने स्वागत केले. दोघांमध्ये आध्यात्मिक व सामाजिक विषयांवर सखोल चर्चा झाली. बाळ माने यांनी मठातील शांतीमय व पवित्र वातावरणात दर्शन घेतले आणि ते भावनिक व आध्यात्मिकदृष्ट्या भारावून गेले, असे त्यांनी सांगितले. या भेटीत श्रद्धा, संस्कार आणि समाजसेवा या त्रिसूत्रीचा सुंदर संगम दिसून आला.



