मुख्य बातमी
जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे विज्ञान दिनानिमित्त आकाश दर्शन कार्यक्रम

रत्नागिरी : जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे विज्ञान दिनानिमित्त २८ फेब्रुवारी रोजी शहरातील श्रीमान हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे खगोलशास्त्रविषयक ‘आकाश दर्शन’ हा एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत संपन्न होणार आहे. नामवंत खगोलशास्त्र अभ्यासक प्रोफेसर बाबासाहेब सुतार हे खगोलशास्त्र विषयक मार्गदर्शन करणार आहेत. या उपक्रमामध्ये तज्ञांचे मार्गदर्शन, स्लाईड शो आणि आकाशदर्शन असे कार्यक्रम अंतर्भूत आहेत. तरी या कार्यक्रमासाठी रत्नागिरी परिसरातील विद्यार्थी, खगोल अभ्यासक आणि खगोलप्रेमी यांनी अवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष महेश दामले यांनी केले आहे.


