म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काहाळे यांची पालघरला बदली; पारखे यांच्याकडे सूत्रे

म्हसळा (जि. रायगड, संजय खांबेटे) : म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काहाळे यांची बदली पालघर जिल्ह्यात करण्यात आली असून, त्यांच्या जागी एपीआय रवींद्र अच्युत पारखे यांची म्हसळा पोलीस ठाण्याचे नवे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
रवींद्र पारखे हे महाराष्ट्र पोलीस दलातील अनुभवी अधिकारी असून, त्यांनी यापूर्वीही अनेक ठिकाणी कार्यरत राहून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दक्षता, शिस्तप्रियता आणि गुन्हेगारीविरुद्ध कठोर भूमिका हे त्यांचे कार्यवैशिष्ट्य मानले जाते.
संदीप काहाळे यांनी म्हसळा येथील कार्यकाळात स्थानिक गुन्हेगारी नियंत्रण, अमली पदार्थांवरील निर्बंध, गोवंश हत्या-तस्करी, वाहतूक शिस्त तसेच सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला होता. हिंदू-मुस्लिम समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमात ते सहभागी होत असत. त्यांच्या पालघर बदलीनंतर स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि सहकारी वर्गाकडून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
नवीन प्रभारी म्हणून रवींद्र पारखे यांच्याकडून म्हसळा परिसरातील पोलीस यंत्रणेत नवीन ऊर्जा आणि सजगता निर्माण होईल, यांसह शहरांतील पोलीस ठाण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज इमारत, शहरांत होणारे वाहतूक कोंडी यासारख्या ज्वलंत प्रश्नावर नक्कीच अभ्यास होईल, अशी नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



