‘ऑफ्रोह’चा विभागीय महिला मेळावा व सर्वसाधारण सभा ९ नोव्हेंबर रोजी साताऱ्यात

रत्नागिरी : ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह) शाखा सातारा व ऑफ्रोह महिला आघाडीच्या वतीने ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत कोकण व पश्चिम महाराष्ट्र विभागीय महिला मेळावा व वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती “ऑफ्रोह”चे प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर व सातारा जिल्हाध्यक्ष तानाजी धुमाळ यांनी दिली.
९ नोव्हेंबर रोजी सुरभी मंगल कार्यालय, सातारा येथे हा कार्यक्रम होणार आहे. या विभागीय महिला मेळाव्याला प्रमुख उपस्थिती म्हणून अन्यायग्रस्त आदिवासी समाजाच्या सौ. गितांजली कोळी उपस्थित राहणार असून कोळी नोंदीवरून कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी या जमातीचे जातीचे प्रमाणपत्र व वैधताप्रमाणपत्र सुलभतेने मिळण्याबाबतचा संघर्ष व लढा याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मल्हारराव होळकर यांचे जीवन चरित्र असलेलं ,’मल्हार युग’ या पुस्तकाच्या लेखिका व
‘धनगर मौखिक साहित्य’ या विषयावर पीएचडी प्राप्त, राज्यभरातल्या अनेक पुरस्काराने सन्मानित असलेल्या लेखिका प्रा. आम्रपाली कोकरे यांचे अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील प्रबोधनात्मक व्याख्यान होणार आहे. सर्वसाधारण सभेला “ऑफ्रोह” कार्यकारी राज्याध्यक्ष तथा कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, “ऑफ्रोह”चे कायदे सल्लागार मनोज जुनोनकर, महाराष्ट्र कोळी समाज संघाचे प्रदेश उपाध्यक्ष व “ऑफ्रोह”चे मार्गदर्शक सुधाकर सुसलादी, ऑफ्रोह महिला आघाडीच्या उपाध्यक्ष भारती धुमाळ, “ऑफ्रोह” कोकण विभाग प्रमुख जलदीप तांडेल यांचे मार्गदर्शन लाभणार असून “ऑफ्रोह”चे राज्य प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर, रायगड जिल्हाध्यक्ष मोरेश्वर हाडके, ऑफ्रोह रायगड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष राजश्री बंदरी, कोल्हापूर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगिता गोलाईत, रत्नागिरी ऑफ्रोह जिल्हाध्यक्ष किशोर रोडे, सांगली ऑफ्रोह जिल्हाध्यक्ष संजय कोळी, पुणे ऑफ्रोह जिल्हाध्यक्ष राजेंद्र बेसके, ऑफ्रोह रत्नागिरी उपाध्यक्ष नंदा राणे, व महिला आघाडी व ऑफ्रोहचे अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ऑफ्रोहचे प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर, ऑफ्रोह महिला आघाडीच्या उपाध्यक्ष भारती धुमाळ, जिल्हाध्यक्ष तानाजी धुमाळ, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अंजली बेसके व ऑफ्रोह रत्नागिरी जिल्हाध्यक्ष किशोर रोडे यांनी केले आहे.


