लोकनेते शामरावजी पेजे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन
रत्नागिरीत पुष्पांजली कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : जनतेच्या सेवेला संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे, रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी अमूल्य योगदान देणारे थोर लोकनेते शामराव लक्ष्मण पेजे यांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज (१६ नोव्हेंबर) रत्नागिरी येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. शहरातील माळनाका येथे सकाळी आयोजित केलेल्या पुष्पांजली कार्यक्रमास समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना वंदन केले.
विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा सदस्य म्हणून शामराव पेजे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी ठरत आहे. त्यांची कार्यतत्परता, प्रामाणिकता आणि लोकहितासाठीची निष्ठा ही नवीन पिढीला दिशा देणारी आहे. त्यांच्या कार्याचा हा वारसा आजही समाजाला योग्य मार्ग दाखवत आहे, अशी भावना याप्रसंगी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
हा पुष्पांजली कार्यक्रम कुणबी समजोन्नती संघ, मुंबई (ग्रामीण शाखा रत्नागिरी), कुणबी कर्मचारी सेवा संघ, रत्नागिरी, लोकनेते शामरावजी पेजे स्मृती न्यास आणि कुणबी समाज क्रांती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
या कार्यक्रमाला कुणबी समाजोन्नती संघ रत्नागिरीचे अध्यक्ष रामभाऊ गराटे, पेजे स्मृती न्यासाचे ॲड. सुजित झिमण, विवेक सावंत, संतोष रावणंग, गजानन धनावडे, चाळके, सलील डाफळे, प्रदीप घडशी, सौ. साक्षी रावणंग, विकास पेजे, डॉ. दिलीप नागवेकर, शांताराम खापरे, अनंत नैकर, ॲड. सागर कळंबटे, ॲड. अवधूत कळंबटे, सचिन गिजबिले, प्रकाश मांडवकर, गणेश भारती, प्रसाद उपळेकर, बोंबले गुरुजी, डोर्लेकर, ॲड. संदीप ढवळ यांच्यासह समाजातील विविध सामाजिक स्तरातील पदाधिकारी, समाजबांधवांची उपस्थिती होती.
उपस्थितांनी शामराव पेजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. लोकनेत्याच्या स्मृतींना कोटी कोटी प्रणाम करून हा कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



