मुख्य बातमी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी साक्षरता कार्यक्रम

रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
ज्येष्ठ नागरिक व पालकांचे कल्याण, निर्वाह अधिनियम २००७ या कार्यक्रमाअंतर्गत तरतुदींची माहिती ज्यष्ठ नागरिकांना मिळावी या उद्देशाने १७ नोव्हेंबर जिल्हा न्यायालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पाडला.

याप्रसंगी उपमुख्य लोकअभिरक्षक उन्मेश मुळ्ये यांनी या कायद्याची माहिती ज्येष्ठ नागरिकांना दिली. सहाय्यक लोकअभिरक्षक आयुधा देसाई यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती दिली.
प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी “नालसा स्कीम फॉर सिनियर सिटिझन २०१६” ची माहिती दिली.



