महाराष्ट्रमुख्य बातमीसामाजिक

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजांच्या प्रेरणेतून ९० वे मरणोत्तर देहदान

कणकवली : तरेळे (वाघाचीवाडी) येथील मारुती परशुराम भोगले (वय ७५) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान करण्यात आले. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून झालेले हे ९० वे मरणोत्तर देहदान आहे.

कै. भोगले यांचे पार्थिव नातेवाईक व स्व-स्वरूप संप्रदायाचे पदाधिकारी यांनी गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानकडे सुपूर्द केले आहे. या संस्थानचे डीन प्रो. डॉ. मोहन जोशी यांनी त्याबद्दल कुटुंबीयांचे व जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानचे आभार मानले.

<span;>यावेळी त्यांची पत्नी मनिषा मारुती भोगले, मुलगा प्रथमेश, मुलगी सुजाता, जावई सूर्यकांत सावंत, भाचा सुशांत सूर्यकांत सावंत उपस्थित होते. तसेच स्व-स्वरूप संप्रदायातर्फे देवगड, मालवण, वैभववाडी, कणकवली तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

मृत्यूनंतरही लोकांच्या उपयोगी पडावे, या जगद्गुरूंच्या शिकवणुकीनुसार हजारो भक्तांनी मरणोत्तर देहदानाचे फॉर्म भरून दिले आहेत. त्या इच्छेनुसार हे देहदान करण्यात आले. त्याचा उपयोग वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शरीर रचनाशात्राचा अभ्यास करण्यासाठी होतो. जगद्गुरु श्रींच्या प्रेरणेतून आत्तापर्यंत ९० जणांची देहदान झालेली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!