कोकण नगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (अजित पवार) प्रचाराचा शुभारंभ
स्थानिकांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन

रत्नागिरी : कोकण नगर प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (अजित पवार गट) उमेदवार नौसीन काझी व सौ. मुनव्वर-सुलताना फरहान मुल्ला यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

नौसीन काझी आणि सौ. मुनव्वर मुल्ला हे दोन्ही उमेदवार स्थानिक व तरुण असल्यामुळे मागील काही वर्षांपासून आपल्या संपर्क कार्यालयातून स्थानिकांच्या अडीअडचणीची कामे सोडवत आहेत. त्यामुळे स्थानिकांमध्ये या दोन्ही उमेदवारांना उमेदवारी मिळाल्याने आनंदाचे वातावरण आहे आणि हे स्थानिकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामधून दिसून आले. विशेष करून प्रचारामध्ये स्थानिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.वहिदा बशीर मुर्तुझा यांना शहरातून जो मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. तोच प्रतिसाद कोकण नगर प्रभाग क्रमांक चारमध्येही दिसत आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बशीर मुर्तुझा यांनी या दोन्ही उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचे सांगितले. तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार वहिदा बशीर मूर्तुझा यांना मिळणारा प्रतिसाद पाहून ते भारावून गेले.
यावेळी राष्ट्रवादीचे राजन सुर्वे, मा.युवक शहराध्यक्ष मुजफ्फर काजी, फरहान मुल्ला, तौसीफ डिंगणकर, दानिश पटेल, जावेद परदेसी, शमीम नाईक बहुसंख्य स्थानिक तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.


