मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जि. प. आदर्श शाळा पाली नं. १ आणि पाली ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर उत्साहात 

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पाली नं. १ आणि पाली ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. ही शिबिरे यशस्वी होण्यासाठी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा पाली नं. १ आणि निर्मल ग्रामपंचायत पाली तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली, उपकेंद्र सुरळ यांचे सहकार्य लाभले.

या आरोग्य शिबिरात उपस्थितांची रक्तगट तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, शुगर तपासणी करून त्यावर औषधे – गोळ्या वाटप करण्यात आल्या. या शिबिराचा पाली गावातील सुमारे शंभरजणांनी मोफत लाभ घेतला. तसेच श्री समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था चिपळूण यांच्यावतीने या आरोग्य शिबिरात सर्व ग्रामस्थांचे डोळे मोफत तपासून त्यांना चष्मा माफक दरात देण्याचे सांगण्यात आले.

या आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच अरुण पेजले, उपसरपंच गमरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रशांतशेठ नलावडे, पोलीस पाटील स्तुती नलावडे, मुख्याध्यापक श्री. गुडेकर, श्री. उपरीकर, श्रीमती भामरे, श्री. पठाण, अक्षय गडगे, सौरभ पांगत, सुभाष धामोडे, पुरोहित, मोरे, आरोग्य सेविका श्रीमती नीलम शिंगे, सौ. मोहिते, पाटील, अजित सुतार, नेत्रतज्ञ सुधीर पवार, आदित्य पेढामकर, आशाताई, मंजुश्री फटकरे, योगिता पेजले, अंगणवाडी सेविका यांनी विशेष सहकार्य केले. यावेळी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते संदीप नितोरे यांनी सर्वांसाठी चहा, नाश्त्याची व्यवस्था केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!