अलिबागच्या कराटेपट्टूंचा राष्ट्रीय कराटे स्पर्धेत दबदबा कायम

अलिबाग (राजेश बाष्टे) : सहावी सोके कप ऑल इंडिया ओपन कराटे चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन नुकतेच पनवेल येथे झाले. सहा राज्यांच्या ३२० खेळाडूंनी या स्पर्धेत कटा व कुमिते या दोन्ही विभागात सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे आयोजन क्योशी राजू कोळी यांनी उत्कृष्टरित्या पार पाडले. अलिबाग मधील जपान शिटोऱ्यू कराटे डॉ. इंडिया संघाच्या १५ कराटेपटूंनी क्योशी राहुल श. तावडे (८ डॅन ब्लॅक बेल्ट, जपान) यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेत भाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावत सर्वात जास्त १३ सुवर्णपदक मिळवण्याचा व “६वा सोके चॅम्पियनशिप -२०२६” कप पटकावण्याचा मान मिळवला.
विजेत्यांची नावे अशी : ओवी गायकर (कटा – सुवर्ण, कुमिते – सुवर्ण), श्रीयांस तावडे (कटा – सुवर्ण, कुमिते – सुवर्ण), मुमुक्षा घरत (कटा – सुवर्ण, कुमिते – सुवर्ण), सार्थक मोरे (कटा – सुवर्ण, कुमिते – सुवर्ण), रजाक मुजावर (कटा – कांस्य, कुमिते – सुवर्ण), रुद्र नाईक (कटा – रौप्य, कुमिते – सुवर्ण), श्रीनिष मढवी (कटा – कांस्य, कुमिते – सुवर्ण), हर्षाली जाधव (कटा – रौप्य, कुमिते – सुवर्ण), त्रीश सुतार (कटा – रौप्य, कुमिते – रौप्य), हुनर जैन (कटा – रौप्य, कुमिते – कांस्य), युवराजसिंग दसाना (कटा – कांस्य, कुमिते – कांस्य), स्वरूप दडस (कटा – कांस्य, कुमिते – कांस्य), काव्या तुपट (कुमिते – कांस्य), स्वरांगी दडस (कुमिते – कांस्य), तनिष्क तावडे (कुमिते – सुवर्ण)
या कराटेपटूंचे अलिबागमध्ये सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

