मुख्य बातमी

कोतवडे इंग्लिश स्कूलमध्ये विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा 

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे ग्रामस्थ मंडळ मुंबई संचलित श्री. वि. प. कोतवडे इंग्लिश स्कूल कोतवडेमध्ये २६ व २७ नोव्हेंबर या दिवशी संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी शाळेचे लिपीक संदीप कोलगे यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रेमदास पवार, वरिष्ठ शिक्षक श्री. नाईक, ज्येष्ठ शिक्षिका सौ. सुर्वे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

पहिल्या दिवशी संविधान दिनानिमित्त मुख्याध्यापक श्री. पवार यांनी संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. सायंकाळी सायकल रॅली काढण्यात आली.

आज (२७ नोव्हेंबर) आयोजित कार्यक्रमात श्री. खरात यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संविधान निर्मितीच्या प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी विद्यार्थी यांनी उभे राहून भारताचा नकाशा तयार केला. सर्व धर्मांच्या नावाचे नामफलक तयार करून एकोप्याने राहण्याचा संदेश दिला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. खुळे, श्री. बागूल, श्री. कोलगे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन श्री. नाईक यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!