आबलोली येथे जागतिक महिला दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्यावतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज (१० मार्च) आबलोली गावातील महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज दुपारी २ ते ३ या वेळेत विशेष महिला सभा होणार आहे. त्यानंतर ३ ते ३:३० या वेळेत महिलांसाठी डॉ. गौरी काटदरे या आरोग्य विषयक मार्गदर्शन करणार आहे. यात या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी ३:३० ते ४ या वेळेत एकल महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ४ ते ४:३० या वेळेत महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ५ वाजेपर्यंत महिलांसाठी मनोरंजक खेळांचे कार्यक्रम होतील. ५ ते ५:३० या वेळेत मान्यवरांचे मनोगत व अध्यक्षीय भाषण होईल.
या कार्यक्रमाला महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन निर्मल ग्रामपंचायत आबलोली या ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, ग्रामपंचायत अधिकारी बाबूराव सूर्यवंशी, उपसरपंच अक्षय पागडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.



