मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

डास आणि उंदरांचा वाढता प्रादुर्भाव; गुहागरमध्ये नागरिक त्रस्त

गुहागर : तुंबलेले नाले, त्यावर दिसणारी डासांची अंडी, घरात आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेला उंदरांचा प्रादुर्भाव यामुळे गुहागरमध्ये नागरिक त्रस्त झाले आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणा विविध उपाय करत असतात; मात्र सध्या गुहागरमध्ये निर्माण झालेले हे चित्र या यंत्रणांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.

गेली अनेक वर्षे या गावात कायम राहणारी, सणासुदीला गावात येणारी असे सर्वच मंडळी या समस्यांवर उपाय शोधत आहेत. एका दिवसात सहा सहा उंदीर एकेका घरात मेलेले आढळत आहेत. हा प्रादुर्भाव असाच वाढत राहिला, तर भविष्यात समस्त नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणारे डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, रॅट बाईट फिव्हर या सारखे आजार उद्भवू शकतात. गुहागर येथील वरचा पाट , अष्टवणे, दुर्गादेवी परिसरात याचा जास्त त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

त्यामुळे संबंधित आरोग्य यंत्रणांनी याकडे तातडीने लक्ष देत ठोस उपाय योजना करावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. तसेच नागरिकांनीही या परिसराची जास्तीत जास्त स्वच्छता कशी ठेवता येईल याकडेही लक्ष देण्याचे आवाहन परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ मंडळी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!