शर्वरी पावसकर हिला मानाचा “ट्रस्टेड अँड इनोव्हेटिव्ह आर्किटेक्ट अँड डिझायनर ऑफ द इयर” पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : गोवा येथे आयोजित केलेल्या “डिझाईन अँड व्हिजन बिल्ट एन्व्हायरमेंट लीडरशिप अवॉर्ड” या प्रतिष्ठित पुरस्कार वितरण सोहळ्यात रत्नागिरीची कन्या आर्किटेक्ट शर्वरी रमेश पावसकर हिला मानाचा “ट्रस्टेड अँड इनोव्हेटिव्ह आर्किटेक्ट अँड डिझायनर ऑफ द इयर” हा अत्यंत मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी देशातील २८ राज्यांमधून उत्कृष्ट आर्किटेक्टची निवड करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातून शर्वरीची निवड झाली, ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी मोठी सन्मानाची बाब आहे. हा पुरस्कार शर्वरीच्या परिश्रम, नवोन्मेषी कामकाज, सर्जनशील दृष्टिकोन आणि वास्तुकलेतील उल्लेखनीय योगदानाचे द्योतक आहे.
शर्वरीला हा पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार विजेते पद्मश्री आर्किटेक्ट जी. शंकर या वास्तुकलेतील महान व्यक्तिमत्त्वांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शर्वरीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रत्नागिरीकरांना अत्यंत अभिमान असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरीकरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



