मुख्य बातमीशैक्षणिक

देव, घैसास, कीर महाविद्यालयातर्फे लोकमान्य टिळकांना अभिवादन

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातर्फे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना अभिवादन करण्यात आले. लोकमान्य टिळक जन्मस्थानी भेट देऊन विद्यार्थी नतमस्तक झाले.

या कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील व उपप्राचार्या वसुंधरा जाधव उपस्थित होत्या. टिळक जन्मस्थळ येथील लोकमान्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा. मंदार बेटकर यांनी टिळकांच्या लहापणीची शिक्षणाविषयी आवड गोष्टी स्वरूपात सांगितली. त्यानंतर स्मारकातील संग्रहित फोटो, भिंतीवरील त्यांच्या कविता, त्यांच्या महत्वाच्या घटनांची माहिती, त्यांच्या वापरात येणाऱ्या दैनंदिन वस्तू पाहून विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा पाहायला मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!