५३ व्या तालुकास्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात नॅशनल इंग्लिश स्कूलचे यश

राजापूर : तालुक्यातील नॅशनल इंग्लिश स्कूल व ए. ई. काळसेकर कनिष्ठ महाविद्यालयाने ५३ व्या तालुकास्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. “शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान” या संकल्पनाधिष्ठित विषयावर आधारित प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रात्यक्षिके आणि सादरीकरणांना परीक्षकांकडून उच्च मानांकन लाभले.
या विज्ञान प्रदर्शनात आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेत इयत्ता ९ तील शिवम नरेंद्र कोंबेकर आणि जुल्फा अशफाक काझी यांनी अव्वल कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. गट शिक्षण अधिकारी उत्तम भोसले यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

या प्रदर्शनाचे आयोजन जिल्हा परिषद l, राजापूर पंचायत समिती, विज्ञान व गणित मंडळ राजापूर, नाटे–अंबोळगड केंद्र, तसेच साखरीनाटे एज्युकेशन बोर्ड संचलित मॉडर्न हायस्कूल साखरीनाटे यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय मत्स्य व्यवसाय शाळा साखरीनाटे येथे भव्य स्वरूपात करण्यात आले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक विषयांवरील संकल्पना, मॉडेल्स व प्रात्यक्षिके सादर करून विज्ञान तंत्रज्ञानाच्या उपयुक्ततेचे प्रभावी दर्शन घडवले.
नयन उगले, नितीन लिंगायत व समरीन वाडकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच प्राचार्य शकील मोकाशी, शाळेय शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाध्यक्ष हाजी आसिफअली महामूद चौगुले व सर्व संस्था संचालक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी आयुष्यात अधिक यश संपादन करण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.



