महाराष्ट्रमुख्य बातमी

देवरूखचे ग्रामीण रुग्णालय आता ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय होणार

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नांना यश

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. उद्योग, गुंतवणूक व सेवा, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून आणि पाठपुराव्यातून हा निर्णय झाला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने ९ ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयानुसार देवरुख ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यास “विशेष बाब” म्हणून मान्यता देण्यात आली आहे. श्रेणीवर्धित रुग्णालयासाठी विहित पद्धतीने जागा अधिग्रहित करून बांधकाम करणे आणि पदनिर्मिती करणे याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे.

देवरुख आणि संगमेश्वर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवेसाठी दूर जावे लागू नये, यासाठी देवरुख येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन व्हावे, यासाठी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी शासन दरबारी सातत्यानं प्रयत्न सुरु ठेवले होते.

या निर्णयाबद्दल बोलताना डॉ. सामंत म्हणाले, “देवरुख आणि संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांना त्यांच्या जवळच अधिक चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा आमचा प्रयत्न होता. हा निर्णय घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा मनःपूर्वक आभारी आहे. पुढील सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!