कुसुमताई सहकारी पतसंस्थेला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
१० दिवसांत दीड कोटींच्या ठेवी जमा : ग्राहकांच्या प्रतिसादामुळे १ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : शहरातील प्रथितयश कुसुमताई सहकारी पतसंस्थेचा ठेव वृद्धीमास १ जुलैपासून सुरू झाला असून १० दिवसांमध्ये दीड कोटी रुपयांच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून ठेवींसाठीची मुदत १ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
या कालावधीत ठेवीदारांना आकर्षक व्याजदर व ठेव योजना जाहीर केल्या आहेत. सर्व ठेवीदारांसाठी सर्वाधिक ९ टक्के व्याजदर असून सहा महिन्यांसाठी ६ टक्के व्याजदर, ३ वर्ष मासिक गुंतवणुकीवर (त्रैमासिक व्याज / वार्षिक व्याज) व्याजादर ८ टक्के, तसेच ३ वर्ष पुनर्गुंतवणुकीवर ७.७५ टक्के व्याज ठेवीदारांसाठी ठेवण्यात आले आहे.
याचा लाभ घेऊन सभासदांसह नवीन ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी, असे आवाहन अध्यक्ष प्रा. दत्तात्रय उर्फ नाना शिंदे आणि उपाध्यक्ष सतीश शेवडे यांनी केले आहे. कुसुमताई पतसंस्थेने अल्पावधीतच ग्राहकांमध्ये नाव मिळवले आहे. ग्राहकांसाठी चांगल्या सुविधा पंतसंस्थेकडून देण्यात आलेल्या आहेत. १ जुलैपासून पंतसंस्थेचा ठेववृध्दी मास सुरू झाला आहे.
कुसुमताई सहकारी पतसंस्थेने जुलै ते ऑगस्ट २०२५ असा ठेव वृढी मास जाहीर केला असून पतसंस्थेने यापूर्वी जाहीर केलेल्या ठेववृद्धी मासाला ठेवीदारांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. या विश्वासावर या वर्ष अखेरीस ५० कोटींचा टप्पा पार करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने निश्चित केले आहे.
पतसंस्थेचे भागभांडवल ६९ लाख २० हजार असून ठेवी ४१ कोटी ६७ लाख, कर्ज ३३ कोटी ९८ लाख तर नफा ५० लाख ४५ हजार रूपये, सीडी रेशो ७२.२९ टक्के, तर वसुली ९७ टक्के आहे. यंदा जाहीर केलेल्या योजनेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दहा दिवसांत दीड कोटींच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. सध्या सोनेतारण कर्जाबरोबर जामिनतारण कर्जाला मागणी वाढत आहे. विजबिल भरणा केंद्र सर्व शाखांमध्ये सुरू असून त्याचाही फायदा ग्राहकांना व नागरिकांना मिळत आहे. आपल्या ठेवी पतसंस्थेमध्ये गुंतवणूक करून आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा असे, आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष शेवडे यांनी केले आहे.
दरम्यान, पतसंस्थेच्या एकूण सहा शाखा आहेत. त्यामध्ये रत्नागिरी शहरातील गाडीतळ येथील मुख्य कार्यालय, जाकादेवी बाजारपेठ, खंडाळा बाजारपेठ, खेडशी गयाळवाडी फाटा, पावस बाजारपेठ आणि शुंगारतळी बसस्टॅण्ड येथील शाखांमध्ये ठेवी जमा झाल्या आहेत.


