एसटीच्या चाकाखाली आलेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी : शहरातील एसटी महामंडळाच्या नव्या बसस्थानकासमोर मंगळवारी दुपारी भीषण अपघात घडला. बसस्थानकात येणाऱ्या एसटीने वृद्धाला धडक दिली. या अपघातानंतर वृद्ध एसटीच्या मागच्या चाकाखाली येऊन चिरडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कमलाकर बाबाजी चव्हाण (वय ८२, रा. चव्हाणवाडी, जुवे, रत्नागिरी)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वृद्ध प्रवासी कमलाकर बाबाजी चव्हाण (वय ८२, रा. चव्हाणवाडी, जुवे, रत्नागिरी) हे सकाळी रत्नागिरी बाजारपेठेत आले होते. बसस्थानकासमोरिल मेडिकलमधून आपल्या आजारपणाच्या गोळ्या घेऊन ते घरी जाण्यासाठी नवीन एसटी डेपोत जात होते. त्याचवेळी बसस्थानकात येणाऱ्या चालक बापू कोंड्या आखाडे (वय ५५, रा. जाकादेवी, रत्नागिरी) यांच्या ताब्यातील एसटी बसची त्यांना धडक बसली. बसची मागची चाके त्यांच्या पायावरून गेली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र त्यांचा या दरम्यान मृत्यू झाला.



