मुख्य बातमी
जिल्हा नियोजन समिती बैठक रद्द

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्या (१७ जानेवारी) रोजी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या १३ जानेवारी रोजीच्या पत्रान्वये राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची आचारसंहिता जाहीर झाल्याने ही बैठक रद्द करण्यात आली आहे.
सुधारित दिनांक व वेळ कळविण्यात येईल. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे प्र. जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील यांनी कळविले आहे.



