आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

जिल्हास्तरीय बांबू लागवड व विकास परिषद आज रत्नागिरीत

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज (८ सप्टेंबर) रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय बांबू लागवड व विकास परिषद आयोजित करण्यात आली आहे. बांबूचे महत्त्व शेतकऱ्यांना कळावे तसेच जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढावे व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक शाश्वत आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावा या दृष्टिकोनातून या परिषदेचे आयोजन केलेले आहे.

ही जिल्हास्तरीय बांबू लागवड व विकास परिषद उद्योग तथा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली व राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या परिषदेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!