मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

भाजपचे उपजिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांचा शिवसेनेत प्रवेश

जि. प., पं. स. निवडणुकीच्या तोंडावर गुहागरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ

आबलोली (संदेश कदम) : भाजप उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष तसेच ओबीसी नेते संतोष जैतापकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच युवा सेना जिल्हा प्रमुख मुन्ना देसाई यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.

संतोष जैतापकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे असगोली जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शिवसेना गुहागरमधून असगोली जिल्हा परिषदेसाठी कोणता उमेदवार देणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!