क्रीडामुख्य बातमी

कोतवडे येथे कुसुमेश्वर क्रीडा मंडळाच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेला सुरुवात 

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे येथे कुसुमेश्वर क्रीडा मंडळाच्या माघी गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली.

स्पर्धेचे उद्घाटन गणपतीपुळे मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कोतवडे गावचे सरपंच संतोष बारगोडे, डॉ. संजय पाटील, प्रकाश वारेकर, मालगुंडचे समाज सेवक राजू साळवी, गावातील भारतीय सैन्य दलातील हवालदार मेजर मनोज कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंडळाच्या वतीने अध्यक्ष सत्यवान खुळे, उपाध्यक्ष सुनील कोलगे, संजय मयेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार केले. विश्वास खुळे यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!