मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आगवे रायकरवाडी जिल्हा परिषद शाळेने पालकांच्या श्रमदानातून बांधले दोन विजय बंधारे 

लांजा : भूजल पातळीत वाढ होण्यासाठी, शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी, उन्हाळ्यातील पाणी टंचाईचे सावट दूर करण्यासाठी, जलसंधारणाला चालना देण्यासाठी मिशन बंधारे अभियानांतर्गत शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) रोजी आगवे ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद आगवे रायकरवाडी शाळा, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी, पालक यांच्या श्रमदानातून विजय बंधारे बांधण्यात आले.

गावप्रमुख अनंत रायकर गावप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धिविनायक मंदिराच्या खालच्या बाजूला पाण्याच्या विहिरीजवळ खांडकी या ठिकाणी हे दोन विजय बंधारे बांधण्यात आले. यावेळी लांजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत सोनावले, माजी गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग, सापुचेतळे केंद्रीय प्रमुख स्नेहा कीर यांनी भेट दिली. यावेळी श्री. सोनावले व श्री. सावंग यांनी पालकांचे सहकार्य पाहून समाधान व्यक्त केले. तसेच सर्वांचे आभार मानले. श्रीमती कीर यांनीही सर्वांनी दिलेल्या योगदानाबद्दल धन्यवाद दिले.

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. रश्मी राजेश सनगरे, उपाध्यक्षा सौ. अनामिका ज्ञानेश्वर आग्रे, सदस्य सौ. मधुरा मारुती रायकर, सौ. सुप्रिया निलेश रायकर, सौ. शालिनी कैलास रायकर, सौ. आरोही नितीन रायकर, पालक सौ. सिद्धी संदीप रायकर, सौ. संजना शंकर रायकर, राजेश दत्ताराम सनगरे, प्रमोद शिवराम रायकर, शंकर महादेव नमसले, सीताराम तानू रायकर, देऊ हरी धडम, शाळेचे मुख्याध्यापक मकरंद लिंगायत, उपशिक्षक अमेय बाळकृष्ण जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. शाळेचे मुख्याध्यापक मकरंद लिंगायत यांनी सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!