मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

ही निवडणूक विकासाला सर्वार्थाने चालना देणारी ठरेल : नुपुरा मुळ्ये

संगमेश्वर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अंतिम टप्प्यातील प्रचाराला वेग आला असून मुचरी जि. प. गटाच्या अपक्ष उमेदवार सौ. नुपुरा मुळ्ये व त्यांचे कार्यकर्ते जोरदार मुसंडी मारताना दिसत आहेत. समोर दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतानाही त्यांनी उपलब्ध कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जि. प. गटातील आपला प्रचार सातत्याने सुरू ठेवला.

विकासाचा अजेंडा मतदारांसमोर मांडताना त्या म्हणाल्या, “भावनिक करून अथवा दडपशाही करून निवडणूक जिंकण्यापेक्षा व्हिजन समोर ठेऊन निवडणूक जिंकणे माझे उद्दिष्ट आहे. माझ्यासह कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत असून आमची मेहनत जनताजनार्दन पहात आहे. त्यांना विकासाची परिकल्पना नकोय; प्रत्यक्षात हवाय. त्यांच्या या अपेक्षेवर मी नियोजनबद्ध काम करणार असल्याचे त्यांच्या लक्षात येत आहे.”

त्या पुढे म्हणाल्या, “गेल्या काही वर्षांत मी या भागात संपर्क वाढवला होता. या प्रचाराच्या निमित्ताने तो दृढ झाल्याचे मला पहायला मिळत आहे. कुणी बहीण, कुणी लेक तर कुणी सून म्हणून मला स्वीकारत आहेत. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन देत आहेत. याच शिदोरीवर मी ही निवडणूक आणि पुढील ५ वर्षे या भागाला विकासाच्या दिशेने नेईन असा विश्वास यानिमित्ताने देते.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!