मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

ठाकरे शिवसेनेचे लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा क्षेत्रप्रमुख जयसिंग (जया) माने यांचा राजीनामा

साखरपा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा क्षेत्रप्रमुख जयसिंग (जया) माने यांनी वैयक्तिक कारण देत आपल्या पदाचा व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे पाठविला आहे.

मागील ३० वर्षे त्यांनी शिवसेना पक्षासाठी अखंड वेळ देत सक्रिय राजकारण केले होते. १९९४ साली विद्यार्थी दशेत असताना शाखाप्रमुख पदापासून आपल्या कार्याला प्रारंभ केला. त्यानंतर पक्षबांधणी आणि पक्षवाढीसाठी मेहनत घेतली होती. त्याचबरोबर सर्व पक्षीयांमध्ये सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचे संघटन कौशल्य असणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. संगमेश्वर पंचायत समिती सभापती असताना त्यांनी केलेली कामगिरी सुद्धा उल्लेखनीय होती. दरम्यान, भविष्यात जया माने काय निर्णय घेतात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!