मुख्य बातमी
रत्नागिरी शहरात दोन दुचाकी आगीत जळून खाक

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथे डॅफोडील इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या एका इलेक्ट्रिक दुचाकीला अचानक आग लागली. कोणाला काही समजण्यापूर्वी या आगीने आपले रौद्ररूप धारण केले. अचानक घडलेल्या या घटनेने इमारतीत राहणाऱ्या तसेच आजूबाजूच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

या दुचाकीच्या शेजारी पार्क असलेल्या दुसऱ्या गाडीने पेट घेतला आणि या दोन्ही गाड्या आगीत भस्मसात झाल्या. त्या शेजारी असलेल्या आणखी एका गाडीने देखील पेट घेतला; परंतु अग्निशमनच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली त्यामुळे तिसरी दुचाकी अर्धवट जळली. या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, घटनेची खबर मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले.



