प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदत

रत्नागिरी : प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबातील पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ३१ डिंसेबर २०२५ पूर्वी www.ksb.gov.in या संकेतस्थळावर भरावेत व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
ॲनेक्स्चर – १, २ आणि ३ हे सुधारित नमुने वापरावेत. जिल्ह्याचे नाव केएसबी संकेतस्थळावरील यादीप्रमाणे लिहावे. कोणत्याही दोन मुलांना अर्ज करता येईल. एकाच कोर्ससाठी शिष्यवृत्ती एकदाच मिळते. ॲनेक्स्चर -२ वरील स्वाक्ष-यांसंबंधीत अधिकारी यांच्या असाव्यात. कोर्सचे नाव अर्जातील ड्रॉप-डाउन यादीप्रमाणे लिहावे. फक्त राष्ट्रीयीकृत (एसबीआय/पीएनबी) किंवा कॉर्पोरेट बँक(एचडीएफसी/आयसीआयसीआय/ॲक्सिस) पासबुकचे पहिले पान अपलोड करावे.अपूर्ण अथवा चुकीचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.



