मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
सुयश कॉम्प्युटर सेंटरतर्फे पडवेतील नवनिर्वाचित उमेदवारांचे जल्लोषात स्वागत

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हा परिषद गटातून महेश नाटेकर तसेच पडवे पंचायत समिती गणातून नीलेश सुर्वे आणि पाचेरी सडा गणातून सुचिता घाणेकर हे उमेदवार विजयी झाले. या तिन्ही विजयी उमेदवारांचा आबलोली (ता. गुहागर) येथील सुयश कॉम्पुटर सेंटरच्या वतीने विजयी उमेदवारांचा शाल घालून, पुष्पगुच्छ देऊन आणि पेढे भरवून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी उमेदवार यांच्यासोबत सागर काजरोळकर, विजय वैद्य, राजू कारेकर, प्रदीप सुर्वे, विशाल गोताड, शरद पावरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



