भाट्ये दुचाकी अपघात; एकाची प्रकृती चिंताजनक

रत्नागिरी : रत्नागिरी ते पावस जाणार्या रस्त्यावर भाट्ये गावाकडे जााणार्या फाट्यासमोर भरधाव बुलेट दुचाकीची समोरून येणार्या अॅक्टिव्हा दुचाकीला धडक बसून अपघात झाला. ही घटना आज (६ ऑगस्ट) दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातात बुलेट चालक राजेश दिनकर कीर (४१, रा. रनपार, रत्नागिरी) आपल्या ताब्यातील बुलेटवरून (एमएच- ०८-एडब्ल्यू-४०५०) मिलिंद कृष्णा महाडिक (४७, रा. फणसोप, रत्नागिरी) यांना घेऊन रत्नागिरी ते पावस असे जात होते. त्याच सुमारास मानसी राजेंद्र पवार ही तरुणी आपल्या ताब्यातील अॅक्टिव्हा दुचाकी (एमएच-०८-एझेड-१८२४) तिची बहिण ॠद्राक्षा राजेंद्र पवार (१७, दोन्ही रा. भाट्ये खोतवाडी, रत्नागिरी) हिला घेऊन कॉलेजला जात होती. या दोन्ही दुचाकी भाट्ये गावाकडे जाणार्या फाट्यासमोर आल्या असता बुलेट चालक राजेश कीर यांचा आपल्या दुचाकीवरील ताबा सुटला आणि त्याने समोरून येणार्या अॅक्टिव्हाला जोरदार धडक देत अपघात केला.
ही धडक इतकी जोरदार होती की त्यामुळे बुलेट चालक राजेश कीर रस्त्यावर फेकले आहेत गेले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघाताची माहिती मिळातच शहर पोलीस कर्मचारी आणि माजी पंचायत समिती सदस्य सुरेंद्र भाटकर आणि स्थानिक नागरिकांनी चारही जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले.
अपघातातील इतर तीन जखमींची प्रकृती स्थिर असून बुलेट चालक राजेश कीर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरू होती.

