महाराष्ट्रमुख्य बातमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी होणार अंत्यसंस्कार

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती येथे उद्या (गुरुवारी) सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अंत्यसंस्कारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

अंत्यसंस्कारांपूर्वी अजित पवार यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी शारदा प्रांगण येथे ठेवले जाणार आहे. अपघाताची दुःखद बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुंबईहून, तर खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीहून तातडीने बारामतीत दाखल झाले आहेत.

दरम्यान, अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्ते आणि नागरिकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली असून, परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

पुणे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आज (२८ जानेवारी) आणि उद्या (२९ जानेवारी) पुणे शहर बंद ठेवण्यात येणार असून, उद्या मार्केटयार्डही बंद राहणार आहे. प्रशासनाकडून शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!