मुख्य बातमी

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना गणेशगुळे येथे आज मानवंदना

रत्नागिरी : आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज (१७ फेब्रुवारी) त्यांच्या मूळ स्थानी म्हणजेच गणेशगुळे येथे ‘मानवंदना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रेणुका प्रतिष्ठान, रत्नागिरी आणि जिजामाता शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा हा कार्यक्रम सायंकाळी ४ वाजता होईल. या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतीकारकांच्या स्मृतींना उजाळा दिला जाणार असून, यामध्ये गीत गायन, कथाकथन, कविता सादरीकरण आणि प्रेरणादायक घोषणा अशा विविध उपक्रमांचा समावेश असणार आहे.

वासुदेव बळवंत फडके यांच्या महान कार्याची ओळख नवीन पिढीला व्हावी आणि त्यांच्या बलिदानाचा सन्मान व्हावा, या उद्देशाने या प्रेरक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. रेणुका प्रतिष्ठानच्या अध्यक्षा दीपा पाटकर आणि जिजामाता शाखेच्या कार्यवाहिका वेदिका मुळे यांनी गणेशगुळे येथील सर्व बंधू-भगिनींना या मानवंदना कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!