मुख्य बातमी
रेणुका प्रतिष्ठानतर्फे प्लास्टिक हटाव अभियान

रत्नागिरी : रेणुका प्रतिष्ठान व राष्ट्र सेविका समितीतर्फे प्लास्टिक हटाव उपक्रम राबवला जात आहे. काल (२५ फेब्रुवारी) सायंकाळी मारुती मंदिर परिसरात स्टेडियमच्या मागे असलेल्या भाजी मार्केटमध्ये कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
तिथे येणाऱ्या गृहिणींनी हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगितले. शिवाय भाजी विक्रेत्यांनी ही गिऱ्हाईकांना कापडी पिशवी वापरण्यासाठी प्रोत्साहित केले. ज्यांनी पिशवी आणली होती, त्यांचे रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरीची पिशवी भेट देउन कौतुक केले. तर ज्यांनी आणली नव्हती त्यांना कापडी पिशवी भेट देऊन नेहमी कापडी पिशवी वापरण्याची विनंती केली.
या उपक्रमात रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरीच्या अध्यक्षा सौ. दीपा पाटकर व राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांनी भाग घेतला.



