कवी केशवसुत स्मारक (मालगुंड) येथे उद्या मराठी भाषा गौरव दिन

रत्नागिरी : कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून मराठी भाषा विभाग, मराठी भाषा समिती जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील कवी केशवसुत स्मारकात दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी मनुज जिंदल, उपजिल्हाधिकारी व मराठी भाषा समिती अध्यक्ष विश्वजीत गाताडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंड व सदस्य मराठी भाषा समिती गजानन पाटील, रत्नागिरी कोकण मराठी साहित्य परिषदेचे (कोमसाप) अध्यक्ष आनंद शेलार, ‘कोमसाप’चे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे हे उपस्थित राहणार आहेत.


