मुख्य बातमी

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी ९ मार्चपर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

रत्नागिरी : कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रमांचा लाभ ग्रामीण भागातील तळागळातील सर्व घटकांपर्यंत पोहचावा व युवकांना स्थानिक ठिकाणी रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी प्राप्त होऊन ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतर कमी व्हावे, याकरीता स्वतंत्र प्रशिक्षण भागीदार (टीपी) नियुक्त करण्यासाठी संभाव्य संस्थाकडून ९ मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

स्वतंत्र प्रशिक्षण भागीदार (टीपी) यांनी मंडणगड तालुक्यातील देवारे, दापोली तालुक्यातील जालगाव, रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव, नाचणे, गुहागर तालुक्यातील पालशेत, लांजा तालुक्यातील भांबेड, राजापूर सागवे, खेड तालुक्यातील भरणे, चिपळूण खेर्डी, सावर्डे, व संगमेश्वर कडवई या केंद्रांसाठी ९ मार्चपर्यंत https://docs.google.com/document/d/1PpirPAnA0s9Pk5RL3a3MYpqC2ktwR8fA/edit?usp=sharing&ouid=१११३०२८०८२२८८४८९६६३५३&rtpof-true&sd=true या लिंकवरून प्रस्ताव डाउनलोड करून दोन प्रतीत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आवार, नाचणे रोड, एमआयडीसी मिरजोळे, रत्नागिरी या कार्यालयास सादर करावा.

याबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास सहायक सोनल सावंत (८०६३९९५४२३) यांना संपर्क करण्याचे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता प्र. सहाय्यक आयुक्त मो. ए. दुधाळ यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!