खेड भाजपाच्या वतीने रक्तदान शिबिर उत्साहात

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा रत्नागिरी सरचिटणीस ॲड. मिलिंद नांदगावकर यांच्या संकल्पनेतून तसेच भाजपा नेते तथा खेड नगरपालिके माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनातून भव्य रक्तदान शिबिर खेड येथे झाले.
यामध्ये ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या दात्यांना एक स्मार्ट वॉच व एयर बर्ड्स फ्री देण्यात आले. शिबिराचे उद्घाटन खेड शहरातील सुप्रसिद्ध डॉ. संजीव धारिया यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी भाजपा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दापोली पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते, भाजपा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, खेडच्या मा.नगराध्यक्षा उर्मिला पाटणे-शेट्ये, भाजपा महिला मोर्चा खेड शहर उपाध्यक्ष प्रीती चिखले, भाजपा उपशहर अध्यक्षा मीनल गुहागरकर, भाजपा खेड शहर चिटणीस राकेश चव्हाण, बाबु नांदगावकर, स्वराज गांधी, प्रणव मापुस्कर तसेच कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



