मुख्य बातमी

झाबुवा खून प्रकरणातील संशयित आरोपी सापडले रत्नागिरीत

रत्नागिरी : झाबुवा पोलीस ठाण्यात (जि. झाबुवा रा. मध्यप्रदेश) दाखल असलेल्या खून प्रकरणातील तीन संशयितांना रत्नागिरी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केले असून, पुढील कारवाईसाठी या तिघांनाही झाबुवा (मध्यप्रदेश) पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी म्हणून दाउद सन ऑफ चिलिया वाकला, नब्बु सन ऑफ चिलिया वाकला आणि चिलिया सन ऑफ कलिसिंग वाकला (सर्व रा. झाबुवा, मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे.

कोतवाली झाबुवा पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर क्रमांक 340/2026,भारतीय न्याय संहिता कलम 191(1), 191(2), 191(3), 190, 103(1), 296(1), 351(2) अन्वये नोंद असलेल्या खून प्रकरणातील संशयित आरोपी रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा गुन्हा घडल्यापासून संबंधित आरोपी फरार होते. या आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. हे पथक आज रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकातील अंमलदार यांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत त्यांना अटक करून पुढील तपासासाठी संबंधित आरोपींना झाबुवा (मध्यप्रदेश) पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. महामुनी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी माईणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे, सहायक पोलीस फौजदार दीपक साळवी, पोलीस हवालदार भालचंद्र मयेकर, पोलीस कॉन्स्टेबल नीलेश शिंगावे यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!