Uncategorized

रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शोकसभा

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी तालुका आणि शहर यांच्या वतीने राज्याचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांची शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. ही शोकसभा उद्या (३१ जानेवारी) सायंकाळी ५ वाजता हॉटेल व्यंकटेश हॉल मारुती मंदिर येथे होणार आहे.

२८ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले व संपूर्ण महाराष्ट्रात शोक कळा पसरली. स्वर्गीय अजित पवार यांच्याप्रती शोक व्यक्त करण्यासाठी समस्त रत्नागिरी मधील सर्वपक्षीय पदाधिकारी सदस्य, संस्था, वकील, डॉक्टर्स, बिल्डर, हॉटेल असोसिएशन, सर्व मंडळे, ट्रस्ट, आस्थापने, सर्व सामान्य ते वरिष्ठ जनतेच्या यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!