मुख्य बातमी
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

रत्नागिरी : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, देशाचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी अभिवादन केले. यावेळी अधिकारी, कर्मचारी यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.



