मुख्य बातमी

दिव्यांगांसाठी विशेष आधार कार्ड शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (२७ नोव्हेंबर) रोजी दिव्यांग व्यक्तींचे आधार कार्ड काढण्यासाठी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी येथे, सकाळी ११ ते ४ या वेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये जे दिव्यांग व्यक्ती किंवा बालके अजूनही आधार कार्ड पासून वंचित आहे. त्यांचे आधार कार्ड नोंदणी करण्यात येणार आहेत. या शिबिराला येताना नमूद केलेली कागदपत्रे सोबत आणावीत. १८ वर्षांखालील मुलांसाठी QR कोड असलेला जन्मदाखला, दिव्यांग बालकाचे आई किंवा वडिल त्यांच्या आधारकार्डसह स्वतः उपस्थिती असणे आवश्यक आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी मतदान ओळखपत्र.

तसेच या शिबिरात दिव्यांग व्यक्तीचे आधार कार्ड अपडेट करणे,आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे,आधार कार्डला लिंक मोबाईल नंबर बदलणे आदी सेवा उपलब्ध असतील. या करीता स्वतः दिव्यांग व्यक्ती शिबिराच्या ठिकाणी हजर असणे आवश्यक आहे.असे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या प्रकल्प संचालिका श्रीमती सुरेखा पाथरे यांनी कळविले आहे.

ज्या दिव्यांग व्यक्तींनी अगोदर आधार कार्ड काढण्याचा प्रयत्न केला असेल त्यांनी कृपया सोबत अगोदरच्या आधार पावत्या आणाव्यात. अधिक माहितीसाठी 9834440200 जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी 8591903608 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!