मुख्य बातमी
रत्नागिरीतील काशिविश्वेश्वर मंदिरात आज महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

रत्नागिरी : शहरातील राजीवडा येथील सुप्रसिद्ध श्री देव काशिविश्वेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारी रोजी हा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा होईल. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आणि भजनांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ३ या वेळात भक्तांसाठी प्रसादाचे वाटप केले जाईल. महाशिवरात्री उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा आणि श्रींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव काशिविश्वेश्वर देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.
दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी गाड्या पार्किंगची विशेष व्यवस्था मंदिराशेजारी श्री. जोशी यांच्या कम्पाऊंडमध्ये करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापन समितीने दिली आहे.


