मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागरची सुकन्या पारमी पवारला दोन राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील तळवली गावचे सुपुत्र तसेच गुहागर तालुका कला मंचाचे संस्थापक, अध्यक्ष, नाटककार आणि मराठी मालिकांचे व्यवस्थापक रवींद्र पवार यांची सुकन्या आणि सुप्रसिद्ध निवेदिका पारमी दीपाली रवींद्र पवार हिला राज्यस्तरीय माता सावित्रीबाई फुले सन्मान गौरव पुरस्कार आणि राज्यस्तरीय नृत्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

‘दिशा महाराष्ट्राची’च्या वतीने राज्यस्तरीय माता सावित्रीबाई फुले सन्मान सोहळातसेच राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव सोहळा २०२६ मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. हा पुरस्कार तिला ललित साहित्यिक व आदर्श शिक्षिका मनीषा शिरटावले यांच्या हस्ते, तसेच ॲड. पूजा कांबळे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदर्श मुख्याध्यापिका आणि सुप्रसिद्ध निवेदिका अर्चना मोहिते यांनी भूषविले. पारमी पवार हिला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल गुहागर तालुक्यातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या संपूर्ण पुरस्कार सोहळ्याचे नीटनेटके नियोजन “दिशा महाराष्ट्राची”चे तुषार नेवरेकर, संचालिका सौ. सपना तुषार नेवरेकर यांनी केले होते. या संपूर्ण कार्यक्रमाला महाराष्ट्रातून रसिकांनी गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!