आरोग्यमुख्य बातमी

कै. ल. ग. पटवर्धन शाळेत “टीडब्ल्यूजे”च्या सहकार्याने महिलांसाठी आरोग्य शिबीर 

रत्नागिरी : महिलांचे आरोग्य निरोगी असावे, त्यांनी वेळच्या वेळी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी या उद्देशाने शहरातील कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिर आणि टीडब्ल्यूजे (TWJ) स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खास महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर नुकतेच पार पडले.

जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय घवाळी आणि डॉ. सायली जाधव यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. त्यांच्या जोडीला प्रवीण भोसर, राम प्रसाद चिंचोळे, रत्नप्रभा राडये, प्राजक्ता जाधव, समीक्षा दैत या आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष तपासणीसाठी सहकार्य केले. टीडब्ल्यूजे या स्वयंसेवी संस्थेच्या शलाका मालशे, मुक्ता पाठारे, ज्ञानदीप तोडकर, सुमित बानप या सर्वांचा या शिबिरात मोलाचा वाटा होता.

या शिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, रक्त तपासणी, स्तन कर्करोग आदी तपासण्या करण्यात आल्या. आरोग्य तपासणीबरोबरच रक्तवाढ, कॅल्शियम, जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. या शिबिरात शिक्षिका, सेविका कर्मचारीभाषेचं महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आरोग्य तपासणी करून घेतली.

जिल्हा शासकीय रुग्णालयाची टीम व टीडब्ल्यूजे टीममधील सर्वांना फुलझाडांची रोपे भेट देऊन उपक्रम यशस्वी केल्याबद्दल शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सहभागी महिलांनी हे शिबीर आयोजित केल्याबद्दल समाधान व आभार व्यक्त केले.

हा उपक्रम नियोजनपूर्वक व उत्तम रीतीने पार पडण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. राजवाडे, बालवाडी प्रमुख श्रीमती महाडिक व सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर यांनी या उपक्रमाबाबत सर्वांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!