मुख्य बातमीराजकारण

खासदार नारायण राणे यांचा रत्नागिरी जिल्ह्यात जनता दरबार

रत्नागिरी : जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. जनता दरबाराचे आयोजन हे तीन टप्प्यात असणार आहे. मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खासदार राणे यांनी विशेष प्रयत्न करावे यासाठी या जनता दरबारचे आयोजन आहे.
खासदार नारायण राणे यांचा जनता दरबार २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता चिपळूण येथील सहकार भवन येथे होणार आहे. यामध्ये चिपळूण तालुक्यातील प्रश्न घेऊन नागरिकांनी उपस्थित राहायचे आहे. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मराठा हॉल भाजपा तालुका कार्यालयजवळ देवरुख (ता. संगमेश्वर) येथे संगमेश्वर तालुक्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे. तर २९ ऑक्टोबर रोजी ११ वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात (जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) येथे रत्नागिरी तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन जनता दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!