रमाकांत साळवी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

आबलोली : गुहागर तालुक्यातील खोडदे गावचे माजी सरपंच रमाकांत विष्णू साळवी यांचा ऐकाहत्तरी जन्मदिन सोहळा २३ मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी सायंकाळी ७ वाजता शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून रमाकांत साळवी मित्र मंडळ, साळवी परिवार, आप्तेष्ट आणि श्री. गजानन होतकरु संघ खोडदे देऊळवाडी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
यानिमित्ताने २३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता कोकणी ग्रुप खोडदे यांच्या सौजन्याने माजी पोलीस पाटील रमाकांत विष्णू साळवी यांची वह्या तुला, साखर तुला व जल तुला हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात येईल. सायंकाळी ७ वाजता अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर ८ ते ९.३० या वेळेत उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले असून रात्री ११ वाजता रमाकांत साळवी मित्र मंडळ यांच्या सौजन्याने देवरुख कोल्हेवाडी येथील श्री सोळजाई नाट्य नमन मंडळ यांचा बहुरंगी बहुढंगी नमनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात लहान मुलांसाठी खास मिकी माऊसचे आकर्षण ठेवण्यात आले आह. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित आदवडे करणार आहेत.



